Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

भाजपा युवा मोर्चातर्फे ‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’ची प्रभावी अंमलबजावणी

कुदळवाडी येथे ‘लाभार्थी संवाद’ चे आयोजन; प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची उपस्थिती

पिंपरी । प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपा शहराध्यक्ष तथा शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात ‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’अंतर्गत ‘लाभार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन कुदळवाडी येथे करण्यात आले.

यावेळी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजयुमो राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी गौरव गौतम, सुदर्शन पाटसकर, गणेश वर्पे, अजित कुलथे, संकेत चोंधे, शिवराज लांडगे,रवी जांभुळकर, उदय गायकवाड, संतोष मोरे, सचिन जयभाय हे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – ब्रिजभूषण सिंह यांना क्लीन चिट, दिल्ली पोलिसांकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट

माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते. सर्व लाभार्थी यांनी आपण कोण-कोणत्या योजनेचा लाभ घेतला? यांची सविस्तर माहिती यावेळी दिली.सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सामान्य नागरिकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करत आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोचविण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते काम करीत आहेत, अशा भावना राहुल लोणीकर यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन साळी यांनी केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button