बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्तेना जीवे मारण्याचा धमकी
वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार मोठी घोषणा
![Bigg Boss, House, Advocate, Gunaratna, Sadavarte, Jeeve, Dhakriti, Worli, Assembly, Constituency, Election, Big, Announcement,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/sadavarte-780x470.jpg)
महाराष्ट्र : बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आलाय. इंटरनॅशनल काॅलवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. निनावी क्रमांकावरून हा काॅल आल्याची माहिती आहे. वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने तसेच जिजामाता नगर संदर्भात वक्तव्यामुळे जीवे मारण्याची दिली धमकी मिळाली असा आरोप करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याठी रवाना झाल्या आहेत.
गुणरत्न सदावर्ते बिग बॉस हिंदीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्ते नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. याआधी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केलीये. आपण वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार यासाठई मला रिंगणात उतरायचं आहे असं ते म्हणाले होते. माझी ही इच्छा महायुतीला कळवली आहे. महायुतीने मला संधी द्यावी. मी 25 हजाराहून अधिक मताधिक्याने लीड घेईन आणि आदित्य ठाकरे यांचा पराभव करेल असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते.
पुढे ते म्हणाले की, मी शरद पवारांना घाबरलो नाही, मी कधी ठाकरेंना घाबरलो नाही. त्यामुळे महायुतीने माझा विचार करावा. मी वरळीतील जिजामाता नगरमध्ये असलेल्या 8000 झोपडीवासियांचा विकास करेल. त्यांना 600 स्क्वेअर फुटाचे घर देणार आणि एक मोठं रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी तयार करणार”, अशी घोषणा देखील त्यांनी केली होती.
याआधीही आलाय धमकीचा फोन
याआधीही सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. भारताबाहेरून जीवे मारण्याची धमकी आल्याचं गुणरत्न सदावर्तेंन भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतर हा धमकीचा फोन आल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.