Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी : पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच! विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भूमिका 

निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतरच महाविकास आघाडीचा निर्णय

पुणे । विशेष प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार बोलताना म्हणाले की, माझ्या माहिती प्रमाणे लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिले आहेत. रेकॉर्ड पाहिलं तर कमी वेळ शिल्लक असतानाही निवडणुका झाल्या आहेत. पण या निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगच निर्णय घेईल. निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तर सर्व राजकीय पक्ष एकत्र येतील आणि तेही निर्णय घेतील. तर मागील निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. तसाच यावेळीही घेतला जाईल.

निवडणूक आयोगाने अजून पोटनिवडणुकीची घोषणा केली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. रितसर घोषणा झाल्यावर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन ठरवतील. बिनविरोध निवडणूक होणार अशी चर्चा झालीच नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : प्रसारमाध्यमांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सल्ला; विरोधात बातम्यांमुळे झाले व्यथीत!

पुणे लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचा दावा? 

वास्तविक, पुणे लोकसभा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना जागावाटपात काँग्रेसला दिला जात होता. मात्र, महाविकास आघाडीमुळे राजकीय समीकरण बदलणार आहे. कसबा पोटनिवडणुकीची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली. आता पुणे लोकसभा मतदार संघाच्या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दावा करणार आहे. कारण, या मतदार संघातील पुण्यातील ८ विधानसभा मतदार संघात भाजपाशी तुल्यबळ ताकद राष्ट्रवादीची आहे. तसेच, पुणे महापालिका आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता मिळवायची असेल, तर लोकसभा पोटनिवडणुकीत विजयश्री खेचून आणण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींना उमेदवारी घेण्याबाबत गळ घातली जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेही या जागेवर आपला उमेदवार देणार असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपामधून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि माजी खासदार संजय काकडे अशी तीन नावांवर चर्चा सुरू आहे, असे समजते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button