Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मोठी बातमी: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा–शिवसेना शिंदे गटाची नैसर्गिक युती निश्चित!

दोन्ही राष्ट्रवादीला विरोधक म्हणून मैदानात उतरणार : शिंदे गटाचा 45 ते 50 जागांवर दावा

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांची नैसर्गिक युती निश्चित झाली आहे. युतीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रारंभी, शिंदे गटाने स्वबळावर १२८ जागा लढवण्याचा निर्धार केला होता आणि इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले गेले होते. त्यामुळे युती होणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब होत असल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने महापालिका १२८ पैकी अंदाजे ४५–५० जागा मागितल्या आहेत. युतीवर शिक्कामोर्तब होताच जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत स्थानिक नेत्यांकडून पुढील रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक ३, ८, ९, ११, १२ आणि १३ या जागांवर विशेष लक्ष देण्याचे ठरले आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातील 10 ते 12 जागा आणि चिंचवडमधील 14 ते 18 जागा शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी मिळाव्यात असा प्रस्ताव आहे.

या प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये धनंजय आल्हाट, निलेश मुटके, डॉ. भालेराव, सचिन सानप, सुखदेव नरळे, आशा भालेकर, सुलभा उबाळे आणि शुभांगी बोराडे यांचा समावेश आहे. स्थानिक नेत्यांच्या मते, उमेदवारांची लोकप्रियता आणि अनुभव यांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याचा निर्णय घेतला असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांनी याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

विशेष म्हणजे, भाजप–शिंदे गट राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे करत आहे, आणि आगामी महापालिका निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे. युतीमुळे सत्ता मिळवण्यासाठी स्थानिक नेतृत्वाला मिळणारा फायदा आणि उमेदवारांची ताकद निर्णायक ठरेल, अशी राजकीय विश्लेषकांची मते आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button