breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

Chandrashekhar Azad Shot : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा हल्ला झाला आहे. चंद्रशेखर आझाद यांना स्थानिक शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चंद्रशेखर आझाद बहुजन मिशन चळवळीशी संबंधित एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी देवबंदमध्ये उपस्थित असताना हा हल्ला झाला आहे.

हेही वाचा – ‘भारतातील सर्व मुस्लीम आधी हिंदू होते आणि त्याआधी..’; रामदास आठवलेंचं विधान चर्चेत

https://twitter.com/ANI/status/1674034997324554240

अर्ध्या तासापूर्वी चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही कारवाल्या सशस्त्र लोकांनी गोळीबार केला. एक गोळी त्यांच्याजवळून गेली. तो ठीक आहे आणि त्याला वैद्यकीय उपचारासाठी सीएचसीमध्ये नेण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे, अशी माहिती एसएसपी डॉ. विपिन टाडा यांनी ANI ला दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button