Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
मोदी, शाहांसह फडणवीस करणार कर्नाटकमध्ये प्रचार; भाजपच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अमित शाह हे राज्यात प्रचार करणात आहेत.
कर्नाटक विधानसभेसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून आज स्टार प्रचारकांची यादी भाजपाने जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतमारामन, स्मृती ईराणी, आसामचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, हेमंत बिसवा सरमा या दिग्गज नेत्यांनी नावे आहेत. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव या यादीत आहे.





