‘संभाजी भिडेंनी तिरंग्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये’; बच्चू कडू यांचा इशारा
![bacchu kadu said that Sambhaji Bhide should not try to destroy the tricolor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/sambhaji-bhide-and-bacchu-kadu-780x470.jpg)
मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण ताजं असतानाच त्यांनी १५ ऑगस्टरोजी भगवा रॅली काढू असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. दरम्यान, यावरून प्राहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडे यांनी इशारा दिला आहे.
हेही वाचा – नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? महाराष्ट्र अंनिसचा शासनाला संतप्त सवाल
प्रहार जनशक्ती पक्ष व अमरावती सायकल असोसिएशन द्वारा आयोजित
"शहिदो के सन्मानमे सायकल रॅली"
स्थळ :- नेहरू मैदान, अमरावती ते यावली शहीद
वेळ – सकाळी १० वाजता
दि. १५ ऑगस्ट २०२३संपर्क :-
संदीप रोंघे 8379921963, संजय गोमकाळे 9860042025 pic.twitter.com/kuyx425Jf5— BACCHU KADU (@RealBacchuKadu) August 12, 2023
आमदार बच्चू कडू म्हणाले की, तिरंगा हा राष्ट्रध्वज आहे. संभाजी भिडे यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा अवमान करू नये त्यामुळे असंख्य हिंदूवर संशयाची सुई निर्माण होईल. हिंदुत्वाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी असं काही करू नये. भगव्याचा सहारा घेऊन तिरंग्याला डीवचण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. नाही तर त्यांना भोगावे ते लागेल.