ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? महाराष्ट्र अंनिसचा शासनाला संतप्त सवाल

दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभर आणि देशभर विविध कार्यक्रम

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घुण खुनाला येत्या २० ऑगस्टला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. माननीय उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्यानंतर सी.बी.आय.ने सचिन अन्दुरे आणि शरद कळसकर ह्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संशयित मारेकर्यांना अटक केली होती. त्यांच्यावर खटला देखील चालू आहे. असे असले तरी या खूनाच्या मागचे सूत्रधार अजून फरारच आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. दाभोलकर ह्याचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? असा सवाल तपास यंत्रणांना महाराष्ट्र अंनिस मार्फत एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात यांनी विचारला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश ह्यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांच्या मध्ये हे चारही खून एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांच्या कडून झाल्याचे पुढे आले आहे .असे असताना देखील शासन ह्या संघटनेच्या विषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही हे निषेधार्ह आहे. डॉ. दाभोलकरांच्या संशयित मारेकर्यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्यामधून हा खून करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हंटले आहे अशा पार्श्वभूमीवर मारेकऱ्यांच्या इतकेच त्याची डोकी नियोजनबद्ध पद्धतीने भडकवणारे सूत्रधार देखील जबादार आहेत .जोपर्यंत हे सूत्रधार मोकाट आहेत तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. त्यामुळे आणखी वेळ न दवडता ह्या सूत्रधारांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा देखील अंनिसच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

देशभरात कार्यक्रम :

आज दुप्पट जोमाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारत भर पोहचत आहेत. चार वर्षांच्या पासून ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क ह्या संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट हा दाभोलकरांचा स्मृती दिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. ह्या अंतर्गत झारखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, सारख्या दुर्गम राज्यांच्या पासून ते दिल्ली, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश अशा पंधरापेक्षा अधिक राज्यांच्या मध्ये हा उपक्रम केला जातो.

डॉ. सुनीलकुमार लवटे आणि त्यांच्या सहकार्यांच्या पुढाकाराने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पंधरा पुस्तके हिंदी मध्ये भाषांतरित झाली आहेत. त्या मधील अनेक पुस्तकांच्या तिसऱ्या चौथ्या आवृत्त्या बाहेर येत आहेत. इंग्लिशमध्ये भाषांतरित झालेल्या पुस्तकांना देखील असाच प्रतिसाद आहे.

‘डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ या उपक्रमाच्या अंतर्गत डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांच्या बारा पुस्तिकांचा संच महा.अंनिस मार्फत प्रकाशित करण्यात आला असून त्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत पन्नास हजार पुस्तकांची नोंदणी झाली आहे. या संचाचे लोकार्पण अच्युत गोडबोले यांच्या हस्ते १७ ऑगस्ट रोजी पुणे विद्यापीठ येथे करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुण्यात शिक्षण संचालकांच्या कार्यालयात पालकांचा ठिय्या!

पुण्यातील कार्यक्रम :

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पुणे येथे तसेच राज्यभर आयोजित कार्यक्रमांची पुढीलप्रमाणे माहिती देण्यात आली.

१६ ऑगस्ट : फोटो प्रदर्शन
नंदिनी जाधव यांनी गेल्या दहा वर्षात जटमुक्त केलेल्या २७५ पेक्षा अधिक महिलांच्या विषयी बातम्या त्यांचे अनुभव याच्यावर आधारित प्रदर्शन
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर चे कलादालन, वेळ सकाळी १० ते संध्या ८
प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक आणि अंनिस महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार

१७ ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ पुस्तकांचे लोकार्पण
हस्ते- अच्युत गोडबोले
अध्यक्ष- डॉ. सुरेश गोसावी. (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),
प्रमुख उपस्थिती : हमीद दाभोलकर, राहुल थोरात
स्थळ- रिफ्रेट्री सभागृह ,सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे.
वेळ: सायंकाळी ५ ते ७

१८ ऑगस्ट :
जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याविषयी चर्चासत्र.
डॉक्टरांच्या निर्घृण खुनानंतर मंजूर झालेला जादूटोणा विरोधी कायदा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांतून आकाराला आलेला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या दोन कायद्यांच्या मंजुरीच्या प्रक्रीयेपासून त्यांची सद्यस्थितीतील अंमलबाजवणी या विषयी पुण्यातील आय. एल. एस. लॉं कॉलेज व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सदर चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.
वेळ: सकाळी १.३० ते ५.३०
स्थळ: आय. एल. एस. विधी महाविद्यालय, लॉं कॉलेज रोड, पुणे.
प्रमुख उपस्थिती : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री हेमंत गोखले आणि एडवोकेट अभय नेवगी.

१९ ऑगस्ट : अंनिसचा हास्य जागर
अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील महाराष्ट्रातील मान्यवर अभिनेत्यांनी लिहून बसवलेली दोन स्कीट व त्या अनुषंगाने चर्चा.
प्रमुख उपस्थिती : सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सोनाली कुलकर्णी आणि अतुल पेठे
वेळ: संध्याकाळी ५ ते ७
स्थळ: साने गुरुजी स्मारक, (पत्ता: राष्ट्र सेवादल, मध्यवर्ती कार्यालय, दांडेकर पूलाच्या जवळ)

२० ऑगस्ट : कायदा प्रबोधन यात्रा प्रारंभ
वेळ: सकाळी ११ वा.
स्थळ: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काढण्यात येणार्‍या महाराष्ट्रव्यापी जादूटोणा विरोधी कायदा यात्रेचा आरंभ.
हस्ते: अशोक धिवरे, माजी पोलीस महानिरीक्षक
चर्चासत्र: विषय: वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारित समाजधारणेची सद्यस्थिती
वेळ: संध्याकाळी ५ ते ७.३०
स्थळ: साने गुरुजी स्मारक, (राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय,दांडेकर पूलाच्या जवळ )
सहभाग: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अलका धुपकर, प्रतिक सिन्हा (संपादक,अल्ट न्यूज), आशिष दिक्षित (संपादक,बी. बी. सी.)

हिंदी अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन

या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तीन हिंदी भाषेतील पुस्तकांचे लोकार्पण केले जाईल.
प्रमुख उपस्थिती- डॉ.सुनीलकुमार लवटे

महाराष्ट्रभर कार्यक्रम :

या सोबत सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी २० ऑगस्ट रोजी निर्भय मॉर्निंग वॉक फेरी , जिल्हाधिकारी/ तहसीलदार यांना निवेदन देणे.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे व्हिडियो दाखवून त्याच्यावर चर्चा

अभिवादन सभा, स्मृतीजागर असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
तसेच ‘डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ उपक्रमातील पुस्तक संचांचे लोकार्पण देखील राज्यातील प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button