‘मनोज जरांगे आणि छगन भुजबळांनी एकत्र यावं’; बच्चू कडूंचं वक्तव्य चर्चेत
![Bacchu Kadu said that Manoj Jarange and Chhagan Bhujbal should come together](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Manoj-Jarange-Patil-and-Chhagan-Bhujbal-1-780x470.jpg)
पुणे | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला होता. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. या वादावरून आमदार बच्चू कडू यांनी एक मोठं विधान केलं आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, कुणबी, ओबीसी वाद मिटला पाहिजे. महाराष्ट्र पुन्हा शांत झाला पाहिजे. मराठवाड्यातला जो मराठा आहे तो कुणबी आहेच. कोकणातले मराठ्यांनी हात वर केले आहेत. त्यांनी आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण मागितलं आहे. जो मराठा समाज आहे तो कुणबीमध्ये म्हणजेच ओबीसीत समावेश झाल्यानंतर इतर ओबीसींमध्ये भय निर्माण झालं आहे हे सत्य आहे. ही भीती काढून टाकण्यासाठी छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंनी एकत्र यावं आणि दिल्लीसमोर लढा द्यावा. मी यासाठी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे या दोघांचीही भेट घेणार आहे.
हेही वाचा – खासदार ओम राजेनिंबाळकरांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, मराठ्यांच्या अन्नात..
दरम्यान, महाराष्ट्र शांत रहावा यासाठी बच्चू कडू यांनी हे आवाहन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांनाही केलं आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हे बच्चू कडूंची भेट झाल्यानंतर काय भूमिका घेणार? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.