‘आजकाल #&$@ सुद्धा आमदार होतात’; बच्चू कडू यांचं वादग्रस्त वक्तव्य नंतर माफीनामा
![Bacchu Kadu said that even third-party MLAs are becoming MLAs these days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Bacchu-Kadu-1-780x470.jpg)
मुंबई : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मात्र नंतर त्यांना आपली चूक लक्षात येताच माफीही मागितली. आज काल तृतीयपंथीयही आमदार होतात असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. ते जळगावातल्या एका सभेत बोलत होते. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आता माफी मागितली आहे.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते पण कळत नाही, असे लोकही आमदार होतात. तृतीयपंथीयही आमदार होतात असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.
हेही वाचा – Ganesh Utsav 2023 : हरतालिका म्हणजे काय? हे नाव तिला कसे प्रप्त झाले? वाचा सविस्तर..
आमदार बच्चू कडू यांना आपण जे बोललो ते चुकीचं होतं हे लक्षात आल्यानंतर बच्चू कडू यांनी या वक्तव्याबाबत माफी मागत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आंडू-पांडू लोक आमदार होतात असं मला म्हणायचं होतं मी चुकीचा शब्द बोलून गेलो त्याबद्दल माफी मागतो, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
जळगावात काँग्रेसच्या रॅलीत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेचाही बच्चू कडू यांनी कडक शब्दात समाचार घेतला. कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होता कामा नये. एखादी संस्था असं करत असेल तर अशा संस्था बंद केल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा प्रकार प्रहार जनशक्ती खपवून घेणार नाही, संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.