‘औरंगजेब आणि त्याचं कुटुंब लुटारु होतं’; रामदेवबाबा यांचं वक्तव्य

Ramdev Baba | औरंगजेब हा लुटारु होता त्याचं कुटुंब लुटारु होतं. भारत लुटायला तो आणि त्याचं खानदान चालून आलं होतं त्याचा आदर्श आपल्यापुढे कसा काय असेल? आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं वक्तव्य रामदेवबाबा यांनी केलं आहे. नागपुरात पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी रामदेव बाबा बोलत होते.
रामदेवबाबा म्हणाले, की औरंगजेब भारताचा आदर्श असूच शकत नाही, तो क्रूर होता. औरंगजेब लुटारु होता त्याचं कुटुंब लुटारु होतं. बाबर काही भारतात काही घडवायला आला नव्हता. बाबर, अकबर, औरंगजेब त्यांची मुलं या सगळ्यांनी हरम तयार केले. आपल्या हजारो आया-बहिणींची त्यांनी बेअब्रू केली. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशी माणसं आपला आदर्श असूच शकत नाहीत. आपला सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, औरंगजेब आमचा आदर्श असूच शकत नाही.
हेही वाचा : रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार?
ट्रम्प यांनी टेरिफ टेररिझमचा नवीन पायंडा पाडला आहे. त्यांनी लोकशाही पायदळी तुडवली आहे. ते वर्ल्ड बँकचंही ऐकत नाहीत. डॉलरची किंमत वाढवली, गरीब विकसनशील देशांच्या पैश्यांची किंमत कमी करून एक प्रकाराने आर्थिक दहशतवाद डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत. ट्रम्प, पुतीन, शी जिनपिंग यांचा भरवसा नाही. भारताला विकसनशील बनवलं पाहिजे. काही शक्तीशाली देश जगाला विनाशाकडे नेण्याचा काम करत आहेत. त्यासाठी भारतीयांनी एकजुटीने सशक्त राष्ट्र निर्माण करत विध्वंसक ताकदीला उत्तर दिले पाहिजे, असं आवाहन रामदेवबाबा यांनी केलं आहे.