Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण
खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी आज आठवले यांची पिंपरी येथे सभा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/blobhttpsweb.whatsapp.com2356d3d7-4b10-411c-8c7a-ccae9b789227-12-780x470.jpg)
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर आज संध्याकाळी पाच वाजता आठवले यांची सभा होणार आहे. या सभेला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा – अखेर बहुचर्चित T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर..!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे व शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.