Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबईराजकारण

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(पीएमआरडीए)चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

मेट्रो मार्गाचा विस्तार

मेट्रो मार्गाचा विस्तार पिंपरी चिंचवड ते निगडी येथेपर्यंत केला जाणार असून या जवळपास साडेचार किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 910 कोटी रुपये आहे या मार्गावर तीन स्थानक प्रस्तावित आहेत. तसेच भक्ती शक्ती ते चाकण प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मोरवाडी मेट्रोस्थानकाच्या जवळ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची अडचण दूर करण्यात यावी व यासाठी पार्किंगसाठी देण्यात आलेल्या जागेचा विकास केला जावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केल्या. यावेळी पिंपरी चिंचवड महानगर विकास आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतूक, जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुविधा यांचा समावेश आहे याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा    :      समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

यासह पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोसाठी पार्किंग झोन आणि इतर सुविधा, शहराच्या विविध भागांना जोड मार्ग, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याची टाकी. घनकचरा व्यवस्थापन व मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी, अण्णासाहेब मगर स्टेडियम, संविधान भवनचे काम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्कृष्टता केंद्र यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

पीएमआरडीएकडून पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या कामाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत बंगले प्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत

इंद्रायणी नदीच्या पात्रातील अनधिकृत 36 बंगले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाडण्यात आले. या बंगल्यांचे बांधकाम करण्यापूर्वी महानगरपालिकेकडून बांधकाम परवानगी घेण्यात आली नव्हती. या प्रकरणात महानगरपालिकेच्या बीट निरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, यातील दोषी व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशा सूचना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button