Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर स्वागतच”; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य

प्रकाश आंबेडकर मविआत येणार असल्याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही

मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना-वंचितच्या युतीची घोषणा केली होती. आपली युती शिवसेनेशी असून महाविकास आघाडीशी नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत जाण्याची आपली इच्छा नसल्याचे म्हटले. मात्र आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर स्वागतच, असं वक्तव्य काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केलं आहे.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर स्वागतच आहे. मागे मी प्रयत्न केले होते, पण तेव्हा ठरले नाही. आता उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते येत असतील तर स्वागतच आहे. तसेच प्रकाश आंबेडकर मविआत येणार असल्याबाबत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

श्री श्री रविशंकर हे पहिल्यांदाच नांदेडमध्ये येत आहेत. धर्मनिरपेक्ष, हिंसामुक्त विचार, सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहेत. एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कौठा परिसरात मामा चौकातील मौदानात महासत्संग होणार आहे. तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात येत असल्याने भाविकांना उत्सुकता लागली आहे. ते नांदेडमध्ये मुक्कामी असतील. या कार्यक्रमासाठी जवळपास दीड लाख लोक येण्याची शक्यता आहे, असंही चव्हाण म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button