ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला महापौर रवि लांडगे यांची भेट

शहरातील नागरी सेवांचे तांत्रिक पद्धतीने होणाऱ्या कामकाजाची घेतली सविस्तर माहिती

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) येथे महापौर रवि लांडगे यांनी भेट देऊन शहरातील विविध नागरी सेवांचे तांत्रिक पद्धतीने करण्यात येणारे मॉनिटरिंग व नियंत्रण प्रणालीची सविस्तर माहिती घेतली.

स्मार्ट सिटी संकल्पनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या कमांड सेंटरच्या माध्यमातून शहरातील विविध नागरी सेवा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणाऱ्या प्रतिसाद प्रणालीचे एकाच ठिकाणाहून रिअल-टाईम निरीक्षण केले जाते. या प्रणालीमुळे शहरातील विविध घडामोडींवर त्वरित लक्ष ठेवणे तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणे अधिक सुलभ झाले आहे.अशी माहिती कार्यकारी अभियंता अभिमान भोसले यांनी महापौर रवि लांडगे यांना दिली.

या भेटीदरम्यान महापौर रवि लांडगे यांनी शहरातील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन प्रणाली तसेच विविध विभागांचे रिअल-टाईम मॉनिटरिंग याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शहरातील नागरिकांना सुरक्षित, सुकर व अधिक कार्यक्षम नागरी सेवा देण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा      :            नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार : सभापती संजय नाना काटे 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरातील एकूण ८ हजार ७९० सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण प्रणालीशी जोडण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून शहरातील विविध प्रमुख चौक, रस्ते तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांवर सतत देखरेख ठेवली जात आहे. त्यापैकी सध्या ३ हजार ८२७ कॅमेरे कार्यरत असून त्यांचे थेट प्रक्षेपण कमांड सेंटरमधून पाहता येते. तसेच काही कॅमेरे देखभाल, दुरुस्ती अथवा तांत्रिक कारणांमुळे तात्पुरते बंद असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. बंद असलेले कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तांत्रिक पर्यायांचा वापर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. संबंधित कॅमेरे तातडीने सुरू करून शहरातील देखरेख व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय शहरातील विविध नागरी सेवांचे अधिक प्रभावी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची कार्यक्षमता अधिक वाढविण्याबाबतचे निर्देश महापौर लांडगे यांनी दिले. महापालिकेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शहरातील प्रशासन अधिक पारदर्शक, जलद व कार्यक्षम करण्यावर भर दिला जात असून या दृष्टीने इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे देखील महापौर रवि लांडगे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button