Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
![Ashish Deshmukh finally joins BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/ashish-deshmukh-780x470.jpg)
मुंबई : काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस, भाजप, काँग्रेस असा प्रवास केलेल्या देशमुख यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आशिष देशमुख यांनी भाजप प्रवेशापुर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी ते म्हणाले की, मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच माझी पुढील राजकीय वाटचाल राहील. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे.
हेही वाचा – अभिनेत्री केतकी चितळेची आदिपुरूषबद्दल पोस्ट चर्चेत, रावणाचा आदरार्थी उल्लेख
२००९ मध्ये नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष असताना माझा प्रवेश भाजपमध्ये झाला होता. पश्चिम नागपूरमधून मला उमेदवारी देऊ केली होती. नितीन गडकरी माझ्यासाठी पितृतुल्य आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. पक्षातील पुढील वाटचाल संयमाने श्रद्धा आणि सबुरीने राहणार आहे, असंही आशिष देशमुख म्हणाले.