breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

अभिनेत्री केतकी चितळेची आदिपुरूषबद्दल पोस्ट चर्चेत, रावणाचा आदरार्थी उल्लेख

Adipurush : आदिपुरूष सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. VFX व इतर वादांमुळे दोनदा टीझर व ट्रेलरमध्ये बदल करण्यात आले. मात्र तरीही प्रेक्षकांची निराशा झाल्याचं स्पष्ट झाले आहे. चित्रपटातील हनुमानाचे संवादावरूनही नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान यावरून अभिनेत्री केतकी चितळे हिने चित्रपटाबद्दल केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

केतकीने आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, बऱ्याच लोकांनी मला विचारले की माझे आदिपुरुष या सिनेमा विषयी काय मत आहे. माझे मत: मी बघितलेला नाही त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण ज्या चित्रपटाच्या टिझर मध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर मी तो चित्रपट बघणारही नाही. रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीर बांधले होते. सोमनाथ मंदीर अनेक वेळा पडले आहे आणि बऱ्याच राजांनी आणि एका राणीने ते पुन्हा बांधले आहे. त्यापैकी एक श्री रावणही आहेत.

हेही वाचा – राज्यात उष्णेतेची लाट! हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

रामायण हा घडलेला इतिहास आहे, फिरंगांनी ठरवलेले मिथ्य नाही. पुरावे आहेत रामायणाचे. नवी पिढी मूर्ख नाही की जे त्यांच्या नावावर बिल फाडून सारवासारव करणे चालू शकेल, असं केतकीने आपल्या पोस्टमधून म्हटलं आहे. तीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवरून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button