‘मणिपूरच्या घटनेतील दोषींना फाशी द्या’; अण्णा हजारेंची मागणी
![Anna Hazare said that the culprits of the Manipur incident should be hanged](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/anna-hazare-780x470.jpg)
मुंबई : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ मे रोजी मणिपूरमधील थौबाला जिल्ह्यात ही घटना घडली आहे. संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या घटनेवरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या प्रकरणातल्या नराधमांना फाशी द्या अशी मागणी केली आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, मणिपूरमध्ये महिलांवर जो अन्याय आणि अत्याचार झाला आणि तो ज्यांनी केला त्या नराधमांना फाशी द्या. स्त्री आपल्या आई प्रमाणे, बहिणीप्रमाणे असते. एक घटना अशीही घडली आहे की एका माजी सैनिकाच्या पत्नीवरही अत्याचार झाला आहे ही बाबही गंभीर आहे. आपल्या रक्षणासाठी तो सैनिक सीमेवर लढत होता. त्याच्या पत्नीवर असा अन्याय होणं दुर्दैवी आहे. मणिपूरची घटना हा माणुसकीवर लागलेला कलंक आहे.
हेही वाचा – जगातील सर्वात जुनी कंपनी कोणती? वाचा संपुर्ण यादी..
VIDEO | Activist Anna Hazare demands death penalty for perpetrators involved in Manipur parading incident; terms it as "blot on humanity". pic.twitter.com/YtP05u7yb1
— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2023
नेमकं काय आहे प्रकरण?
मणिपूरमध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ मे रोजी मणिपूरमधील थौबाला जिल्ह्यात ही घटना घडली आहे.यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य पोलीस दल आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. ५ जिल्ह्यांमधील जमावबंदीबाबतही शिथिलता काढण्यात आली असून तेथे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.