आढळराव पाटलांना मोठा धक्का! शिरूरमध्ये अमोल कोल्हे १८ हजार ६७४ मतांनी आघाडीवर

पिंपरी | लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून सध्या एनडीए २५० हून जास्त जागांवर आघाडीवर तर इंडिया आघाडी २०० हून जास्त जागांवर आघाडीवर आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात चौथ्या फेरी अखेर अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे १८ हजार ६७४ मतांनी आघाडीवर आहेत.
शिरूर लोकसभा मतदार संघ पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भाग येतो. यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर आदी विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात.
हेही वाचा – मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर
२०१९ मध्ये अमोल कोल्हे विजयी झाले होते. त्यांना ६,३५,८३० मते मिळाली होती तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना ५,७७,३७४ मते मिळाली होती. २०१४ मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील ६,४३,४१५ मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी दत्तात्रय निकम यांना पराभूत केले होते. निकम यांना ३,४१,६०१ मते मिळाली होती.





