अमित ठाकरेंना एका चिमुकलीने पत्र लिहीत एक अनोखा केला हट्ट
तुम्हाला आमदार व्हावेच लागेल,अखेरच्या क्षणी माहीममधून मोठा पाठिंबा
![Amit Thackeray, Chimukli, Patra, Hatt, MLA, moment, expertise, support,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/amit-takare-780x470.jpg)
माहीम : निवडणूक आयागोना विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली आणि महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाळी उडाली. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होतं का मविआ त्यांना धक्का देत सत्ता स्थापन करतं हे 23 तारखेलाचं स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे 4 दिवस उरले असून सर्वच उमेदवार रात्रंदिवस घाम गाळू, कंबर कसून प्रचारात व्यस्त आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि मविआमधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्याशी होणार आहे. या तिरंगी लढतीत मतदार कोणाला कौल देतात हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. सध्या अमित ठाकरे हे प्रचारात प्रचंड व्यस्त असून घरोघरी जाऊन, मतदारांशी संवाद साधण्यात ते व्यस्त आहेत.
अमित ठाकरेंना चिमुरडीचं पत्र
दरम्यान अमित ठाकरेंना एका चिमुकलीने पत्र लिहीत एक अनोखा हट्ट केला आहे. तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, असा हट्ट या पत्रातून करण्यात आला आहे. मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलीने हे पत्र लिहीलं असून सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे सध्या प्रचारात खूप व्यस्त असून प्रचारादरम्यान त्यांनी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी भेट दिवली, तेव्हा त्यांना हे पत्र देण्यात आलं. आमच्या भविष्यासाठी तुम्हाला आमदार व्हावे लागेल. पुढच्या वेळी घरी येताना आमदार अमित ठाकरे म्हणुन या, असा लिहीत चिमुरडीने त्यांना हे पत्र दिलं आहे. तुम्ही आमदार झालाच पाहीजे, हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायाचा,अशी मागणीच या मुलीने पत्रातून केली असून तिच्या या बालहट्टाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
अमित ठाकरे यांची ताकद दुप्पट, अखेरच्या क्षणी माहीममधून मोठा पाठिंबा
दरम्यान निवडणुकीला अवघे 4 दिवस असतानाच आता अमित ठाकरेंची ताकद वाढली आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना एका मोठ्या संघटनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या संघटनेच्या पाठिंब्यामुळे अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचा अमित ठाकरे यांना माहीम विधानसभेतून जाहीर पाठिंबा देण्यात आल्याची माहिती मनसे अधिकृत या फेसबुक पेजवरुन देण्यात आली आहे. “मुंबई-ठाणे परिसरात राज्यभरातून बंजारा समाज नोकरी, मजुरी आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर राहत आहे. मुंबईमधील माहिम विधानसभेत बंजारा समाजाची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. गोरगरीब लोकांसाठी असणारी आपुलकी आणि त्यांच्या अडचणींमध्ये धावत जाऊन त्यांना मदत करण्याच्या मनसेच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. म्हणूनच आम्ही अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत” , असे राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मेनका राठोड यांनी अमित ठाकरे यांची भेट घेत भूमिका स्पष्ट केली.