Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची जाणीव जागवणारा प्रेरणादायी सोहळा

वराळे, तळेगाव | डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे, तळेगाव येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल रावसाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. सुरेश शिरबहादूरकर (प्राचार्य), योगेश गुरव, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. प्रमुख पाहुणे कर्नल रावसाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, प्रामाणिकपणा व देशसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.

हेही वाचा       :            पंचायत समिती कुडाळ गणात सोमनाथ कदमांचा ‘गावभेटी’चा धडाका; प्रस्थापितांचे धाबे दणाणले! 

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश शिरबहादूरकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. योगेश गुरव यांनीही मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थी व प्राध्यापकांचे कौतुक केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, नृत्य व नाट्यछटा उपस्थितांच्या विशेष प्रशंसेस पात्र ठरल्या. या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून भारताच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने व राष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याच्या संकल्पाने करण्यात आली. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे, तळेगाव येथील प्रजासत्ताक दिन सोहळा एकता, देशप्रेम व संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा यांचे प्रभावी दर्शन घडवणारा ठरला.

“शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना हेच देशसेवेचे खरे अधिष्ठान आहे. युवकांनी या मूल्यांची जोपासना केली, तर भारताचे भविष्य अधिक सक्षम आणि उज्ज्वल बनेल.”

– कर्नल रावसाहेब पाटील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button