Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘इंदिरा गांधी स्वर्गातून परतल्या तरी ३७० परत येऊ शकत नाही’; अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा

Amit Shah | गृहमंत्री अमित शाह यांची आज धुळे जिल्ह्यात एक सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी पुन्हा कलम ३७० लागू करण्यासाठी प्रस्ताव आणत आहेत. मात्र, आता इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी कलम ३७० पुन्हा आणू शकणार नाहीत, असं अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले, की काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता म्हणत आहेत की, पुन्हा कलम ३७० आणलं जाईल. त्याबाबत त्यांनी एक प्रस्ताव आणला आहे. त्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कलम ३७० आणू असंही ते म्हणत आहेत. मात्र, मी त्यांना सांगतो की, राहुल गांधी तुम्ही तर सोडा इंदिरा गांधी जरी स्वर्गातून परत आल्या तरी ३७० कलम पुन्हा आणू शकणार नाहीत.

हेही वाचा      –        गुलबर्गा, बिदरवासी समाजाची ताकद आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स सरकारचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० म्हणजे तत्कालीन विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button