‘अमित शाह फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात’… संजय राऊतांची खोचक टीका
प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू शकतं,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी महाराष्ट्र कमजोर करायचा हेतू
![Amit Shah, Fadnavis, Prem, Sanjay Raut, Khochak, Tika, Affair, Shiv Sena, NCP, Congress, Maharashtra, weak, motive,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/sanjay-raut-8-780x470.jpg)
मुंबई : महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काही आलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी, महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्यात आलं. त्या तिनही पक्षांमध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांना तर कोणी विचारतच नाही. मुख्यमंत्र्यांनी तर अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. अमित शाह हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत, असं दिसतंय. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू शकतं, अशी घणाघाती टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
महायुतीची मंत्रीमंडळाची बैठक पार पडली, त्यावेळी नेत्यांमध्ये काहीच आलबेल नाही, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावरून राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी खोचक टीका करत हे उत्तर दिलं.