ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अमित शाहचे ‘एक देश एक निवडणूक’ याबाबत वक्तव्य

या प्रस्तावाला मान्यता ,केंद्रात मोठ्या हालचाली सुरू

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एक देश एक निवडणूक असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारीच एक देश एक निवडणूक याबाबतचे वक्तव्य केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाने त्यांच्या जाहीरनाम्यातील महत्वाचा विषयाला मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ज्या दिवशी १०० दिवस पूर्ण झाले होते. त्या दिवसापासून केंद्रात मोठ्या हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या दोन आठवड्यापासून एक देश एक निवडणूक असा प्रस्ताव मंजूर कऱण्यासाठी यंत्रणा कार्यरत होत्या. दरम्यान, आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एक देश एक निवडणूक प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा कायदा कधीपासून लागू होईल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button