कोल्हापुरला जाण्याआधी पुण्यात ओपन जीपमधून अजित पवारांचा ‘रोड शो’
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापूरमध्ये उत्तरदायित्व सभा होणार आहे. कोल्हापुरच्या दौऱ्याआधी अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती करण्यात आली आहे. दरम्यान याआधी अजित पवारांनी शिवाजीनगर परिसरात शक्तीप्रदर्शन केलं आहे.
अजित पवार यांनी ओपन जीपमधून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पुण्यातील शक्तीप्रदर्शनानंतर अजित पवार कोल्हापूरला रवाना होणार आहे. कोल्हापुरात आज त्यांची उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे.
हेही वाचा – INDvsPAK : भारत-पाकिस्तानमध्ये उद्या होणार सुपर लढत; कधी-कुठे पाहाल महामुकाबला?
पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची रविवारी सकाळी 8 वाजता रॅली होणार आहे यनिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे 10 फुटी गुच्छ तयार केलं.@AjitPawarSpeaks#pune#AjitPawar#SachinKharat pic.twitter.com/WLWQxsNT2u
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) September 10, 2023
सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तपोवन मैदानावर सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बॅनर लावण्यात आले आहेत.