breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

INDvsPAK : भारत-पाकिस्तानमध्ये उद्या होणार सुपर लढत; कधी-कुठे पाहाल महामुकाबला?

INDvsPAK : आशिया कपमधील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी हायव्होलटेज सामना रंगणार आहे. कोलंबोच्या मैदानात दोन्ही संघामध्ये पुन्हा एकदा लढत होणार आहे.

२ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेली लढत पावसामुळे रद्द झाली होती. आता रविवारच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पण चाहत्यांसाठी दिलासा म्हणजे सुपर 4 मधील भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यासाठी राखीव दिवस आहे. त्यामुळे उद्या हा सामना थरारक होण्याची शक्यता आहे.

हायव्होलटेज सामन्याची वेळ?

भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. तर दुपारी २.३० वाजता नाणेफेक होणार आहे.

हेही वाचा – सीएंकडून राळेगणसिद्धि आणि शहरातील विद्यार्थ्यांना अर्थ साक्षरतेचे धडे

कुठे रंगणार सामना?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?

हा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह पाहता येणार आहे.

लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?

हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button