Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पवार कुटुंब एकत्र यावं; अजित पवार यांच्या मातोश्रींचं विठूराया चरणी साकडं

Sharad Pawar and Ajit Pawar | पवार कुटुंबामध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठुराया चरणी केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.

आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या सुरूवातीला आज सकाळी विठुरायाचे आणि रूक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विठ्ठलाकडे काय मागणं मागितलं, असं पत्रकारांनी विचारलं असता आशाताई पवार म्हणाल्या, सर्व पवार कुटुंबं एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केली. तसेच राज्यातील जनता सुख-समाधानाने राहू देत, अशीही दोन्ही हात जोडत प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया आशाताई यांनी माध्यमांसमोर दिली.

हेही वाचा     –      क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन 

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय कटुता सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक; बारामतीमधून पवार विरुद्ध पवार, असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. पवार कुटुंबांनी एकत्र यावे यासाठी आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button