iPhone १६ सिरिजची किंमत काय असणार? जाणून घ्या..

iPhone 16 | गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन १६ सिरिजची संपूर्ण जग मोठ्या उत्सुकतनेने वाट पाहात होते. मात्र आज अॅपल कंपनी आयफोन १६ सिरीज लाँच करणार आहे. Apple कंपनीचा iPhone १६ लाँच इव्हेंट हा भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील Apple Cupertino पार्क येथे होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, iPhone १६ सीरीजमध्ये चार मॉडेल्स असणार आहेत. iPhone १६ , iPhone १६ Plus, iPhone १६ Pro आणि iPhone १६ Pro Max. iPhone १६ सिरीज ही iOS18 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. तसेच या सिरीजमधील दोन मॉडेल्स, iPhone १६ आणि iPhone १६ Plus मध्ये A१८ चिपसेट असणार आहे. याशिवाय iPhone १६ Pro आणि iPhone १६ Pro Max मध्ये A१८ Pro चिपसेट असेल.
हेही वाचा – ‘अजितदादा निवडणूक लढवणार, असं मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत’; छगन भुजबळांचं विधान
आयफोन १६ सिरिजची किंमत किती असणार?
आयफोन १६ ची अंदाजे किंमत ही ६६,३०० रुपयांपासून सुरु होऊ शकते. याशिवाय आयफोन १६ पल्स या मोबाईल फोनची किंमत ७४ हजार ६०० रुपयांपासून सुरु होऊ शकते. तर आयफोन १६ प्रो या फोनची किंमत साधारण ९१ हजार २०० रुपयांपासून सुरु होऊ शकते. तसेच आयफोन १६ प्रो मॅक्स हे मॉडेल साधारण ९९ हजार ५०० रुपयांना मिळू शकते. महत्वाचं म्हणजे येत्या २० सप्टेंबरपासून आयफोन १६ सिरीज भारतात विक्रीसाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.





