breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र… तर राज्यात राष्ट्रवादीचा पक्ष पहिल्या क्रमांकावर येईल

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

आपणे नेहमे असे आणि तसे काम झाले पाहिजे सांगतो. पण प्रत्येक नेत्याने आपल्या स्वत:च्या जिल्ह्यामधून आमदार करताना स्वत:बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, असे केल्या आपण राज्यात राष्ट्रवादीचा पक्ष पहिल्या क्रमांकावर येईल, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

आपणे नेहमे असे आणि तसे काम झाले पाहिजे सांगतो. पण प्रत्येक नेत्याने आपल्या स्वत:च्या जिल्ह्यामधून आमदार करताना स्वत:बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, असे केल्या आपण राज्यात राष्ट्रवादीचा पक्ष पहिल्या क्रमांकावर येईल, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८३वा वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कानमंत्र दिला. “माझे शरद पवार यांना सांगणे आहे की, शरद पवार साहेब तुम्ही ८३व्या वर्षात पदार्पण करत आहात. आपणे नेहमे असे आणि तसे काम झाले पाहिजे सांगतो. पण प्रत्येक नेत्याने आपल्या स्वत:च्या जिल्ह्यामधून आमदार करताना स्वत:बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, असे केल्या आपण राज्यात राष्ट्रवादीचा पक्ष पहिल्या क्रमांकावर जाईल. नाशिक पुणे आणि बीड जिल्हा यामधून अपवादात्मक आहे. कारण त्या ठिकाणी परिस्थिती योग्य आहे. पण इतर जिल्ह्यातील नेतेमंडळी तुम्ही कार्यकर्त्यांना चांगले मार्गदर्शन करता. पण तुमच्या स्वत:च्या जिल्ह्यात तुमच्याशिवाय दुसरा कोणी निवडून येतच नाही. मी खरंय ते बोलतो कारण महाराष्ट्रात माझी खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यामुळे आपण मार्गदर्शन करणे गरजेचे आहे”, असे अजित पवार यांनी सांगितले.

“मी जेव्हा कुठेही मार्गदर्शन करत असतो, तेव्हा माझ्या जिल्ह्यामधून जास्तीत जास्त ताकद राष्ट्रवादीला कशी मिळेल यासाठी जिवाचं रान करत असतो. तशाच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे. आज शरद पवारांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी शपथ घ्या की, आपल्या-आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मतभेद असतील, ते सगळे संपवून टाकायचे. त्यावेळी एखाद्या नेत्याला दोन पावलं मागे यावी लागली तरी चालेल. काही बिघडत नाही. शरद पवारांनी नेहमी यशवंतराव चव्हाणांच्या नंतर बेरजेचे राजकारण केले आहे. हे बेरजेचे राजकारण करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी कुठेतरी, कायतरी, आपल्या पक्षात आणि आपल्या घरात काही मागे-पुढे करता आले तरी चालेल”, असेही अजित पवार यांनी सांगितले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरीचे खासदार आता राष्ट्रवादीच्य मंचावर बसलेले आहेत. शिवरायांनी रायरेश्वर येथे शपथ घेतली. तिकडच्या खासदार सुप्रिया सुळेही इथे उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेही आता इथे आहेत. ज्या ठिकाणी शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला. ते ठिकाण म्हणजे प्रतापगड असून, तेही आपले साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याच मतदारसंघात आहे. रायगडला राज्याभिषेक केला. त्या रायगडचेही खासदार राष्ट्रवादीचेच आहेत”, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button