Ajit Pawar | शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान

मुंबई | विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीमधील नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सरकार सत्तेत आल्यानंतर आता त्या घोषणा हवेतच विरल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले, की मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आज तारीख आहे २८ मार्च, मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो. ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मंत्रालय महसूल विभागातील अवर सचिव विजय यादव व महेश वरुडकर यांचा पराक्रम!