ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचं बंड

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर आणि सोईच्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या च पक्षबदलामुळे महायुतीमध्ये मोठे नाराजीनाट्य रंगले. या नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

आपापल्या पक्षातील पदाधिकऱ्यांना प्रवेश द्यायचा नाही, असे आता महायुतीत ठरलेल आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील पदाधिकारी, स्थानिक नेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही ठिकाणी तर महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाच आता ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा      :      नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे. उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे तडकाफडकी राजीनामा देण्याचा हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा देताना ठेंगडे यांनी धक्कादायक असे आरोप केले आहेत. वाशिमची नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होते. आता ऐन निवडणुकीत त्यांनी वाशिमच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यासाठी आलेला एबी फॉर्म जिल्हाप्रमुखांनी स्वतःच्या पत्नी रेखा मापारी यांच्या अर्जाला जोडला आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी वाशिम नगरपरिषदेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची घोषणा केल आहे.

ठेंगडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार
नाराज ठेंगडे यांनी उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन थेट अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता वाशिममध्ये ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. ठेंगडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याने आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा मापारी यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button