Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल, डिझेलनंतर आता सीएनजीही महागला; ११ दिवसांत ६ रुपयांची वाढ

नवी दिल्ली | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीपाठोपाठ आता सर्वसामान्यांना सीएनजी (CNG) दरवाढीचाही मोठा फटका बसला आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये सीएनजीच्या किंमतीत २ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. मागील अवघ्या ११ दिवसांमधली ही चौथी सीएनजी दरवाढ असून, यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीचा भाव ८३.०९ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

सध्या सुरू असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराणचे युद्ध आणि ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ येथील विस्कळीत पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम देशांतर्गत सीएनजीच्या किंमतींवर होत असून लागोपाठ दरवाढ जाहीर केली जात आहे.

११ दिवसांत ४ वेळा दरवाढ

१५ मे पासून सुरू झालेली सीएनजी दरवाढीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या ११ दिवसांत सीएनजी एकूण ६ रुपये प्रति किलोने महागला आहे. १५ मे रोजी सीएनजीच्या दरात पहिली २ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १८ मे रोजी पुन्हा १ रुपयाने सीएनजी महागला. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत म्हणजेच २३ मे रोजी पुन्हा १ रुपयाची दरवाढ करण्यात आली आणि आता २५ मे रोजी थेट २ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा

IMD Monsoon Update : हवामान विभागाकडून मान्सून बाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय?

विविध शहरांमधील सीएनजीचे नवीन दर

या ताज्या दरवाढीनंतर दिल्ली, मुंबई आणि एनसीआर (NCR) परिसरातील सीएनजीचे नवीन दर खालीलप्रमाणे आहेत:

  • नोएडा: ८८.७० रुपये प्रति किलो
  • ग्रेटर नोएडा: ८८.७० रुपये प्रति किलो
  • गाझियाबाद: ८८.७० रुपये प्रति किलो
  • गुरुग्राम: ८६.१२ रुपये प्रति किलो
  • मुंबई: ८४.०० रुपये प्रति किलो
  • दिल्ली: ८३.०९ रुपये प्रति किलो

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता सीएनजीचे दरही वेगाने वाढत असल्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि व्यावसायिक वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button