Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता’; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं

Manikrao Kokate | शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा असतानाच राज्य सरकारमधील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट करत, “३१ मार्चपूर्वी आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा,” असं आवाहन केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही शेतकऱ्यांना सुनावलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

अजित पवारांचं वक्तव्य: “पैशाचं सोंग करता येत नाही”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं, “मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो, ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा.” त्यांच्या या विधानाने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, विरोधकांनी महायुती सरकारवर निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप केला आहे.

माणिकराव कोकाटेंचं शेतकऱ्यांना प्रत्युत्तर: “कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, लग्न करता का?”

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “जे नियमित कर्ज भरतात, त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची, तोपर्यंत कर्ज भरायचं नाही, असं चालतं का? तुमची कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात, त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का?” पुढे ते म्हणाले, “सरकार तुम्हाला पाईपलाईन, सिंचन, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं, मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा.” कोकाटे यांच्या या विधानाने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला आहे.

हेही वाचा  :  प्रभू श्रीरामांच्या स्वागताला ‘महाबली हनुमान’ अवतरले..! 

शेतकऱ्यांचा संताप, विरोधकांचा हल्लाबोल

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारने या मुद्द्यावरून हात झटकल्याने शेतकरी वर्गात असंतोष पसरला आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरत, “शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे,” असा आरोप केला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर टीका करताना विरोधकांनी म्हटलं, “शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि त्यांच्या अडचणींचं सरकारला काहीच देणं-घेणं नाही.”

शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट

कर्जमाफीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास टाळाटाळ केली होती. आता सरकारने कर्जमाफी नाकारल्याने आणि ३१ मार्चची मुदत दिल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. दुसरीकडे, सरकार शेतीसाठी भांडवली गुंतवणूक करत असल्याचा दावा करत आहे, पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

या घडामोडींमुळे महायुती सरकार आणि शेतकरी वर्गातील दरी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा रोष आणि विरोधकांचा दबाव यामुळे सरकार काय पावलं उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button