मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता ‘या’ पक्षात पडणार फूट
![After Shiv Sena, NCP, now there will be a political earthquake in Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/ajit-pawar-eknath-shinde-and-devendra-fadnavis-780x470.jpg)
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्यासोबत काही आमदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेत्याने मोठं विधान केलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, आणखी एक गट सत्तेत येईल. काँग्रेसचे १६-१७ आमदार आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्ष फुटणार आहे, हे नक्की आहे. राज्याच्या मंत्रिमडळाचा विस्तारही लवकर होणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदं दिली जातील, हे तेवढंच सत्य आहे.
हेही वाचा – साळेकर परिवार आणि रास ग्रुप कंपनी यांच्यातर्फे आषाढी वारी मध्ये वस्तू आणि औषध रूपी सेवा
काँग्रेस कधी फुटतेय आणि ते कधी सत्तेत येतात? यासाठी थोडा वाट पाहावी लागेल. पण काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळानंतर काँग्रेसही आमच्याबरोबर दिसेल, असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी शिंदे-सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.