breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक’; आदित्य ठाकरेंची खोचक टीका

मुंबई : मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुका स्थगित केल्या आहेत. यामुळे विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या निवडणुका रद्द करण्यामागे राज्याचे घटनाबाह्य व डरपोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचाही आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक नंबरचे डरपोक आहेत. डरपोक होते, घाबरत होते म्हणून त्यांनी भाजपात उडी घेतली. त्यांनी तसं केलं नसतं तर त्यांना केंद्रीय यंत्रणांनी अटक केली असती. त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती. त्यांची लबाडी पकडली गेली होती. ते झाकण्यासाठी त्यांनी भाजपात उडी घेतली. मग ते सुरतला गेले, गुवाहटीला गेले, गोव्यात गेले आणि जे झालं ते झालं.

हेही वाचा – बेवारस खात्यांची आणि रकमेची माहिती देण्यासाठी RBIने लाँच केले पोर्टल 

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर या डरपोक मुख्यमंत्र्यांचा दबाव होता का, ते घाबरत आहेत. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप होऊ शकत नाहीये. यानंतर किमान मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका तरी होतील असं आम्हाला वाटलं. मात्र, या निवडणुकीला सामोरं जायलाही ते घाबरत असतील, तर आपण समजायचं तरी काय? असं आदित्य ठाकरे म्हणाले.

एवढी सगळी फोडाफोड करूनही ते घाबरत आहेत. त्यांनी दोन पक्ष फोडले. एक कुटुंब फोडलं. महाशक्ती स्थापन केली, एक मुख्यमंत्री, दोन भारदस्त उपमुख्यमंत्री नेमले. त्यांचे आकडे कोणालाच माहिती नाहीत की किती लोक कोणाबरोबर आहेत. महाशक्ती त्यांच्याबरोबर असूनही मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक मिंधे-भाजपाचं सरकार घेऊ शकत नसेल, घाबरत असतील तर काय उपयोग आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button