breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

बेवारस खात्यांची आणि रकमेची माहिती देण्यासाठी RBIने लाँच केले पोर्टल

RBI : बँकांमध्ये अनेकांचे पैसे पडून राहतात, पुढे ते तसेच खात्यावर राहतात. अनेकांच्या मृत्यूनंतर बँकांमध्ये राशी जमा असते, त्याचंही पुढे काही होत नाही. त्यामुळे आता आरबीआयने एक पोर्टल सुरु केलं आहे. त्याद्वारे बेवारस खात्यावरील रकमेची माहिती मिळवता येणार आहे.

आरबीआयच्या वतीने एक रीलीज जारी करण्यात आलेलं आहे. बँका आपल्या वेबसाईटवर वेबारस रकमेची आणि खात्यांची माहिती देत असतात. खातेधारक आणि लाभार्थी यांना सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध होणार असून डेटाची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. आरबीआयने त्यासाठीच आता एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म लाँच केलं आहे.

हेही वाचा – ‘मतपेटीतून राग दाखवल्याशिवाय खड्डे बुजणार नाहीत’; राज ठाकरे

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी बेवारस रकमेच्या शोधासाठी UDGAAM नावाचं एक वेब पोर्टल लाँच केलं आहे. आरबीआयने या पोर्टलच्या ग्राहकांसाठी एकाच ठिकाणी अनेक बँकांमधील रकमेची माहिती दिली आहे. UDGAAM पोर्टलच्या मदतीने ग्राहक सोप्या पद्धतीन ठेवी आणि खाती सहजपणे शोधू शकतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button