मणिपूरमधील ‘नग्न’सत्य आणि हिंसाचार विरोधात आम आदमी पार्टीचा संपुर्ण राज्यात “आक्रोश कँडल मार्च”
![Aam Aadmi Party protest candle march across the state against brutality and violence in Manipur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Aam-Aadmi-Party-pune-780x470.jpg)
पुणे : मणिपूरमध्ये दोन स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढत सामूहिक बलात्कार केला गेला. मे महिन्यातील ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी आहे. त्यामुळे मणिपूर भारतात आहे की नाही, असा प्रश्न मागील अनेक दिवसापासून देशातील लोकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून देशभरात “आक्रोश कॅडल मार्च” काढला जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, परंतु केंद्रातील व राज्यातील मोदी सरकार कोणतीच कारवाई करत नव्हते. त्याचाच फायदा घेऊन महिलांना विवस्त्र फिरवून त्यांच्यावर बलात्कार करण्यापर्यंत त्या आरोपींची मजल गेली आहे. भाजपचे राज्यकर्ते अपयशी ठरल्याचे बघता,लोकांनी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार संपूर्ण देशातील जनतेला मान खाली घालावी लागेल असाच आहे.
हेही वाचा – Weather Update : रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्याला आज रेड अलर्ट
मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना मोकळीक दिली असे तरी सध्या दिसते आहे ह्या हिंसाचाराविरोधात आम आदमी पार्टीने संपूर्ण देशात आणि राज्यातील नागपूर, अमरावती,जळगाव, सांगली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरात मोठ्या संख्येने “आक्रोश कॅडल मार्च” काढला आहे.
मणिपुर मध्ये मोदींचे डबल इंजिन सरकार अपयशी ठरली आहे. भाजपा ने हिंसा रोखली ही नाही, परंतु ते शांत पणे बघत राहिले. मोदी भाजप सरकार ने ४० दिवस मणिपूर मध्ये अत्याचार चालू दिला आणि व्हिडिओ बाहेर आला तर आता काही तरी करण्याचा आव आणत आहेत, असं आप पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले.
भारतात हा प्रकार यापूर्वी शहरातील नागरिकांनीही आम आदमी पार्टीने काढलेल्या “आक्रोश कँडल मार्च” मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.पुण्यामध्ये मोठ्या संख्येने महिला व मणिपुरी लोक यात सामील झाले होते. आम आदमी पक्षाने मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी एम जी रोड कॅम्प येथे केली.