Pune : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अशातच पुण्यातील धरणक्षेत्रात देखील चांगला पाऊस होत आहे. पुण्यातील खडवासला धरण ९१ टक्के भरले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अभियंत्यांनी दिली आहे.
खडकवासला धरण ९१ टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार आणि पाण्याच्या येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे, असं स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – मणिपूरमधील ‘नग्न’सत्य आणि हिंसाचार विरोधात आम आदमी पार्टीचा संपुर्ण राज्यात “आक्रोश कँडल मार्च”
#महत्त्वाची_सूचना
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1712 क्युसेक्स विसर्ग वाढवून रात्री. 11:00 वा. 3424 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी.#DiasterManegment #updates #monsoon #rain #precaution pic.twitter.com/KlRozfE4dy— PCMC (@pcmcindiagovin) July 26, 2023
यापुर्वी धरणातून ४२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र आता धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, मुठा नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे.





