Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

किशोर आवारे हत्या प्रकरणी आमदार सुनील शेळकेंसह सात जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची काल (दि.१२) दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिला आहे.

हेही वाचा – बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना ‘ही’ महिला देणार आव्हान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत होते. जनसेवा सेवा आघाडीच्या माध्यमातून ते तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रीय होते. आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांच्या कार्यकर्ते यांच्यात वाद होत असत.

किशोर आवारे हे त्यांचा मित्र संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असल्याची बाब सुनील शेळके आणि त्यांच्या भावाला आवडत नसे. संतोष शेळके यांना किशोर आवारे सतत मदत करत असत म्हणून सुनील शेळके आवारे यांच्यावर चिडून असे, फिर्यादीत म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button