breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

बालविकास प्रकल्प अधिका-याच्या आत्महत्येप्रकरणी नागपूरातील 3 पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई |

ठाण्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे (Sachin Sable) यांनी 18 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अधिका-यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी आत्महत्येपूर्वी ईमेलद्वारे स्वत: ला पाठवले होते. तो ईमेल पोलिसांना मिळाला. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी नागपूरच्या 3 पोलिस अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरु आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मोरीवली पाडा येथील अष्टविनायक इव्हेन्यू या इमारतीत राहणाऱ्या सचिन साबळे यांनी 18 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशन मध्ये एका व्यक्तीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या नावाखाली नागपूरच्या गुन्हा दाखल झालेल्या तीन अधिकाऱ्यांनी सचिन साबळे यांना त्रास देणे सुरु केले होते. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले होते. सचिन साबळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सर्व प्रकार एका इमेल मध्ये लिहून ते इमेल स्वतःला पाठवले होते.

या प्रकरणी नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनचे विद्यमान पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, त्यांच्या आधीचे पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण या तिघांविरोधात ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. सचिन साबळे यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नागपूरच्या या 3 अधिकाऱ्यांसह नीता खेडकर नावाची एक महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वाचा – सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते निलेश राणेंची राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button