TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मुंबई येथील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी पिंपरी चिंचवडमधून ३ ते ४ हजार कार्यकर्ते जाणार!

पिंपरी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई येथे शिवतीर्थावर होणाऱ्या गुढीपाडव्या मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे तीन ते चार हजार कार्यकर्ते मुंबई येथे जाणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.

मुंबई येथे शिवतीर्थावर गुढीपाडव्यानिमित्त येत्या बुधवारी (दि.२२) हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पूर्वयारीचा एक भाग म्हणून मनसेच्या वतीने बैठक नुकतीच घेण्यात आली.

या बैठकीला मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर कार्यकारणी व अंगीकृत मनसे संघटनेतील सर्व मुख्य पदाधिकारी, उप-शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष, संघटक, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत मेळाव्याला मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधून तीन ते चार हजार कार्यकर्ते घेऊन जाण्याचे नियोजन ठरले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button