Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार १ हजार ई-बस; राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गतशहरासाठी एक हजार ई-बस खरेदीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे लवकरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात या बस दाखल होतील आणि पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक भक्कम होईल. यामुळे शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठीही मदत होणार आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशांना सेवा दिली जाते. पीएमपीच्या ताफ्यात सध्या दोन हजार बस आहेत. त्यातील ७५० बस स्वमालकीच्या तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात किमान तीन हजार बस असणे आवश्यक आहे.

हेही वाचा –  “समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रशासनात ताकद”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. याबाबत मोहोळ म्हणाले, या प्रक्रियेत बससाठी निधी उपलब्ध व्हावा, आवश्यक असलेले पत्र राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठवले जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर तत्काळ प्रस्ताव शासनाने रिझर्व्ह बँकेला पाठविला.

त्यानंतर एक हजार ई-बसचा प्रस्ताव पीएमपीएमलने केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविला. त्यांनी एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्लीत भेट घेत सविस्तर चर्चा केली. त्यानुसार मंगळवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता दिली. त्यामुळे पीएमपीला नव्याने हजार ई-बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला , असे मोहोळ यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button