breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मोदींंची पुन्हा शिवाजी महाराजांशी तुलना : संजय राऊत पुन्हा संतापले

मुंबई | महाईन्यूज

पंतप्रधान मोदींची पुन्हा छत्रपती शिवाजी पुन्हा तुलना करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष आहेत. शिवरायांचा राजकारणासाठी वापर चुकीचा आहे. असा अपमान सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात शिवसेनेवर ज्यांनी तावातावानं टीका केली आहे, ते यावर काय भूमिका घेणार याची मी वाट बघतोय, अशा शब्दात राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच तान्हाजी सिनेमातील एक प्रसंग मार्फ करून व्हायरल करण्यात आला आहे. या प्रसंगात शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा लावलेला आहे. ही चित्रफित सगळीकडं व्हायरल झालेली आहे. या चित्रफितीवरून पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले…

“राजकारणासाठी शिवरायांचा वापर करणं एकदम चूक आहे. छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष आहेत. शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाहीये. हा व्हिडीओ मी संभाजी भिडेंपासून अनेकांना पाठवलेला आहे. शिवाजी महाराजाविषयी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर ज्यांनी तावातावानं टीका केली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहत आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगलीत बंद करणारे आता काय भूमिका घेतात, ते मला बघायचे आहे,” असं संजय राऊत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button