Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक

  • भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
  • पिंपरी-चिंचवड भाजपा युवा मोर्चातर्फे विविध कार्यक्रम

पिंपरी । प्रतिनिधी
भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करण्यात आला. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड भाजपा युवा मोर्चाच्या वतीने स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारतवासीयांचे आदर्शस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जलाभिषेक घालण्यात आला. पुतळा परिसराची सफाई करून शिव वंदनाही करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोसरी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी भाजपा सरचिटणीस विजय फुगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, नंदूशेठ दाभाडे, दिनेश यादव, शिवराज लांडगे, संदीप नखाते, उदय गायकवाड, जैदीप करपे, प्रकाश चौधरी, प्रदीप तापकीर, स्वप्नील गाडे, आदी युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button