एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय : गुलाबराव पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Gulabrao-Patil-and-Eknath-Khadse.jpg)
जळगाव | भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले. याबाबत पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना विचारणा करण्यात आली. या विषयी बोलताना राष्ट्रीय कार्यकारिणी हा भाजपचा विषय आहे, त्यावर बोलणे संयुक्तिक नाही.
मात्र, एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर निश्चितच भाजपने अन्याय केला आहे, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी शनिवारी जाहीर झाली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर देखील संधी देण्यात आलेली नाही.