जपानमधून 100 कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने 34 लाखांची फसवणूक
पिंपरी l प्रतिनिधी
जपान येथून नवीन प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आश्वासन देऊन एका व्यक्तीने व्यावसायिकाची 34 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना जून 2021 ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत निघोजे येथील सुद्धप्राम या कंपनीत घडली.
सुधीर उद्धवराव देश्खैरे (वय 49, रा. वाकड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयशंकर तीयाघ राजन (रा. कोथरूड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना स्काय लाईन प्रॉफिटस ग्रुप हॉंगकॉंग शाखा जपान येथून नविन प्रोजेक्टसाठी 100 कोटी रुपये कर्ज रक्कमेचा पुरवठा करून देतो असे आश्वासन दिले. त्यासाठी फिर्यादी यांच्य्याकडून कागदपत्रे घेऊन 60 दिवसात कर्ज मंजूर करून देतो असे म्हणून कामाचा मोबाद्लाम्हणून आरोपीने त्याच्या बँक खात्यावर 34 लाख रुपये घेतले. दिलेल्या वेळेत कर्ज मंजून करून न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.