breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगेसोबत नवी आघाडी! उमेदवारांची नावे जाहीर

मुंबई | शिवसेना उबाठा गटाने आज १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, महाविकास आघाडीतून ते बाहेर पडले आहेत का? याबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

हेही वाचा    –    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

प्रकाश आंबेडकरांनी एकूण ७ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, मनोज जरांगे यांच्या उमेदवारांबाबत ३० एप्रिलनंतर निर्णय घेतील असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट
गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मढावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलढाणा – वसंत मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – प्रा. राजेंद्र साळुंखे
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग प्रतापराव पवार.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button