breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

बोगस आमदार! आमदार असल्याचा बोर्ड लावून फिरणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांची कारवाई

पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आपल्या खाजगी चार चाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून एक महाभाग फिरवत होता. सासवड पोलिसांनी या महाभागाला ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याला सहा हजार पाचशे रुपयांचा दंड सासवड पोलीस यांनी केला. तर पोलिसांनी हा लोगो सुद्धा त्याच्या कार वरून हटवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुरंदर तालुक्यात एक चार चाकी वाहन एक गोलाकार स्टिकर लाऊन फिरत होते. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून आले होते. पोलिसांनी त्या वाहनांचा पाठलाग देखील केला होता. परंतु ते वाहन सापडलं नाही. मात्र आज सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आमदारकीचे बॅनर लावलेली क्रेटा गाडी मिळाली. त्या गाडीवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते.

गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली असता गाडीमध्ये आमदार महोदय वगैरे कोणीही नव्हते. ही गाडी आमदार महोदयांच्या मालकीची देखील नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आले. गाडीचे मालक ऋतुराज गायकवाड राहणार काळेवाडी हे असल्याचे त्यामधून समोर आले. त्याच बरोबर या क्रेटा गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावलेली आढळून आली. त्याच बरोबर गाडीला ब्लॅक फिलमिंग केलेले आहे. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नव्हता. पोलिसांनी ही गाडीपोलीस स्टेशनला आणून गाडीचा लोगो जप्त केला. तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६५०० रुपये दंड करण्यात आला आहे.

याबाबत सासवड पोलिसांनी अशा प्रकारचे लोगो लावणे बेकायदेशीर असल्याचे म्हटल आहे. कोणीही अशा प्रकारचे लोगो गाडीवर लावू नका. जर असे लोगो आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button