breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पुण्यातील World cup सामने पाहण्यासाठी PMPML ने केले विशेष बसचे नियोजन!

पिंपरी : ५ ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकपचे वारे वाहत आहेत. आतापर्यंत विश्वचषकातील ५ सामने पार पडले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे २ सामने पार पडले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला यश मिळाले असून आता तिसऱ्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. वर्ल्डकप २०२३ मध्ये एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने देशातील वेगवेगळ्या १० ठिकाणी होणार आहेत.

अशातच वर्ल्डकप २०२३ मधील पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे पुण्यात २७ वर्षानंतर विश्वचषक सामने होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या विश्वचषक सामन्यांसंदर्भात PMPML प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

पुण्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांदिवशी वेगवेगळ्या स्थानकावरुन थेट गहुंजे स्टेडियमला जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात येणार आहे. या बसेस पीएमसी बसस्थानक, कात्रज चौक आणि निगडी येथून सोडण्यात येणार आहेत. यामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळणार आहे. PMPML ने घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमी सहजपणे सामना पाहण्यासाठी जाऊ शकतील.

हेही वाचा – ‘हो मला अध्यक्ष करणार होते, पण..’; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट!

पुण्यात या दिवशी होणार वर्ल्डकप सामने :

१९ ऑक्टोबर २०२३ : भारत vs बांगलादेश
३० ऑक्टोबर २०२३ : अफगाणिस्तान vs श्रीलंका
१ नोव्हेंबर २०२३ : न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका
८ नोव्हेंबर २०२३ : इंग्लंड vs नेदरलँड्स
११ नोव्हेंबर २०२३ : ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश

१९, ३०, १, ८ या तारखेचे असे असेल बसेसचे वेळापत्रक :

पुणे मनपा :

दुपारी ११.०० वाजता
दुपारी ११.३५ वाजता
दुपारी १२.०० वाजता
तिकीट शुल्क : १०० रुपये

कात्रज बसस्थानक :

दुपारी ११.०० वाजता
दुपारी ११.३० वाजता
तिकीट शुल्क : १०० रुपये

निगडी बसस्थानक :

दुपारी १२.०० वाजता
दुपारी १२.३० वाजता
तिकीट शुल्क : ५० रुपये

११ नोव्हेंबर बस वेळापत्रक :

पुणे मनपा :

सकाळी ८.२४ वाजता
सकाळी ८.५० वाजता
सकाळी ९.०५ वाजता
तिकीट शुल्क : १०० रुपये

कात्रज बसस्थानक :

सकाळी ८.१५ वाजता
सकाळी ८.३५ वाजता
तिकीट शुल्क : १०० रुपये

निगडी बसस्थानक :

सकाळी ८.३० वाजता
सकाळी ९.०० वाजता
तिकीट शुल्क : ५० रुपये

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button