breaking-newsTOP Newsराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधानांनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय बैठक; महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली |

महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाने थैमान घातलं असून, विषाणू संक्रमण प्रचंड वेगानं वाढलं आहे. मागील तीन दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या सरासरीनं रुग्ण आढळून आल्यानं चिंतेत भर पडली आहे. अचानक रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत लसीकरणाच्या मुद्द्यासह करोना संक्रमण रोखण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये करोना झपाट्याने वाढू लागला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी या आठ राज्यातील रुग्णांची संख्या ८१.४२ टक्के इतकी आहे. तर सर्वाधिक रुग्णासंख्या असलेल्या देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, बंगळुरू, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दहा जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे हे महाराष्ट्रातील असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहे. डॉ. विनोद पॉल हे सुद्धा या बैठकीत सहभागी होणार आहेत, असं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. या बैठकीत करोना लसीकरणाबरोबरच करोना परिस्थितीबाबत चर्चा केली जाणार आहे.

वाचा- छत्तीसगडमध्ये चकमकीत ५ जवान शहीद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button